नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आजच्या युगाचा देव असे म्हटले आहे. पाकविरुद्धच्या सामन्यात विराटने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने प्रभावित होऊन स्वानने ही उपमा दिली आहे.
इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने सचिनला नव्हे तर, 'या' खेळाडूला म्हटलं आहे 'आजचा देव' - ind vs pak
पाकविरुद्धच्या सामन्यात विराटने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने प्रभावित होऊन स्वानने ही उपमा दिली आहे.
स्वान म्हणाला, 'जेव्हा तुमच्या बॅट ला बॉलचा स्पर्श होतो तेव्हा आपल्याला ते कळते. परंतू हा प्रकार पाहताना एका बाजूला स्वतःला नाबाद म्हणणाऱ्यांचा मला तिरस्कार वाटतो. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराटने पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तो मैदानावरून निघून गेला. हि कृती त्याच्यातील खिलाडूवृत्ती दाखवते. म्हणून माझ्यासाठी विराट आधुनिक युगाचा जीजस आहे.'
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना ४७ व्या गोलंदाज मोहम्मद आमिरने मारलेल्या बाउंसरवर यष्टीरक्षकाने झेल घेतल्याने तो बाद झाला. त्यावेळी विराटने कसलातरी आवाज ऐकल्यामुळे स्वत: हून मैदान सोडले. परंतू रिप्लेत बॅट आणि बॉल चा संपर्क झाला नसल्याचे आढळून आले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी कोहलीच्या या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले होते.