मँचेस्टर - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त कामगिरीच्या जोरावर यजमान इंग्लंडने अफगाणिस्तावर दीडशे धावांनी विजय मिळवला. कर्णधार इयान मॉर्गनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर इंग्लंडने अफगाणिस्तापुढे 398 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, तो गाठण्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अपयश आले. 50 षटकांत अफगाणिस्तानने 8 गड्यांच्या मोबदल्यात 247 धावा उभारल्या.
CRICKET WC : साहेबांचा अफगाणिस्तानवर दीडशतकाने विजय - enland won
कर्णधार इयान मॉर्गन याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
इंग्लंडने या विजयाबरोबरच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय फायदेशीर ठरला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने ९० तर जो रुटने ८८ धावांची खेळी केली. नंतर आलेल्या कर्णधार इयान मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावांची आतषबाजी खेळी केली. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलब्दिन नैब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेल्या हसमतुल्लाह शाहिदीने 76 धावांची खेळी साकारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. इंग्लंडकडून गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फिरकीपटू आदिल रशीदने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर, मार्क वूडला २ बळी मिळाले. कर्णधार इयान मॉर्गन याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.