महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडचा अफगाणिस्तानसमोर ३९७ धावांचा डोंगर; कर्णधार मॉर्गनची धडाकेबाज खेळी - england vs afghanistan

अफगाणिस्तानची गोलंदाजी आज सपशेल कोलमडली. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलब्दिन नैब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले आहेत.

इंग्लंडचा अफगाणिस्तानसमोर ३९७ धावांचा डोंगर

By

Published : Jun 18, 2019, 7:57 PM IST

मँन्चेस्टर -विश्वकरंडक स्पर्धेतील आजच्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन, जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने ६ गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावांचा डोंगर उभा केला.

कर्णधार मॉर्गनची धडाकेबाज खेळी

प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय फायदेशीर ठरला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने ९० तर जो रुटने ८८ धावांची खेळी केली. नंतर आलेल्या कर्णधार इयान मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावांची आतषबाजी खेळी केली. मॉर्गनने झटपट फलंदाजी करताना ५७ चेंडूंमध्ये शतक झळकावले. मॉर्गनच्या या खेळीमध्ये ४ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश आहे.

अफगाणिस्तानची गोलंदाजी आज सपशेल कोलमडली. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलब्दिन नैब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले आहेत. विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने ४ लढतींमधून तीन विजयांसह ६ गुणांची कमाई केली असून इंग्लड आज चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details