महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : इंग्लडसमोर बांगलादेशचे शेर झाले सपशेल ढेर - कार्डिफ

सामनावीर जेसन रॉयने केलेल्या १५३ धावांच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने बांगलादेशला ३८७ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २८० धावाच बनवू शकला.

जेसन रॉय

By

Published : Jun 8, 2019, 11:47 PM IST

कार्डिफ- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने बांगलादेशचा १०६ धावांनी पराभव केला. सामनावीर जेसन रॉयने केलेल्या १५३ धावांच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने बांगलादेशला ३८७ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २८० धावाच बनवू शकला.

बांगलादेशचा कर्णधार मशर्फे मोर्तझाने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने आक्रमक फलंदाजी करताना संघाला १२८ धावांची सलामी दिली. बेअरस्टो ५१ धावा काढून बाद झाला. यानंतर, जॉस बटलरने ६४ धावांची खेळी करत संघाला तीनशेपार मजल मारून दिली. तळाचे फलंदाज ख्रिस वोक्स १८ धावा आणि लिआम प्लंकेट २७ धावांच्या छोटेखानी आक्रमक खेळी केल्या. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीनने आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर, मशर्फे मोर्तझा आणि मुस्ताफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.

इंग्लंडच्या ३८७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सोम्या सरकार अवघ्या २ धावा काढून बाद झाला. तर, तमिम इक्बालही १९ धावा काढून तंबूत परतला. परंतु, अनुभवी शाकिब अल-हसनने १२१ धावा आणि मुशफिकुर रहीमने ४४ धावा करताना संघाला सामन्यात कायम ठेवले होते. परंतु, दोघेही बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या. बांगलादेशचा संघ ४८.५ षटकात २८० धावाच करू शकला. मागील विश्वकरंडकात बांगलादेशने इंग्लंडला हरवत त्यांना स्पर्धेबाहेर केले होते. इंग्लंडने त्या पराभवाची परतफेड केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details