लंडन - क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, अशी ओळख असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वकरंडकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया हे २ दिग्गज संघ ऐकमेकांसमोर येणार आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू कसून सराव करत आहेत. हा सराव करत असताना ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा चेंडू एका भारतीय वंशाच्या ब्रिटिश वेगवान गोलंदाजाच्या डोक्याला लागला आहे.
CRICKET WORLDCUP : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच वॉर्नरने 'या' खेळाडूला केले जखमी
जय किशन हा ऑस्ट्रेलियासाठी नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत होता.
david warner
जय किशन असे या खेळाडूचे नाव आहे. ऑस्ट्रेलियासाठी तो नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत होता. वॉर्नरने मारलेला चेंडू किशनच्या डोक्याला लागला. चेंडू लागल्याबरोबर किशन खाली पडला. त्यानंतर वैद्यकीय टीम लगेच मैदानावर आली.
लगेचच किशनला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. किशनने ठिक असल्याचे स्वत: सांगितले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मैदानावरील उपचारांना किशन प्रतिसाद देत होता. आणि उपचार होईपर्यंत वॉर्नर त्याच्या बाजूला बसून होता.