नवी दिल्ली - आज जगभरात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. भारतामध्येसुद्धा योग दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यशाळांचे आयोजन केले गेले आहे. अशाच प्रकारे योग दिनाचे निमित साधून यंदा होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी एका शाळेने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिन : चेन्नईतील एका शाळेने विश्वकप ट्रॉफी साकारत टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा ! - team india
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त चेन्नईतील वेलम्मल नावाच्या शाळेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
चेन्नईतील वेलम्मल नावाच्या शाळेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी योगासने अशा पद्धतीने केली आहेत की, वरून पाहिल्यावर विश्वचषकाची प्रतिकृती दिसते. या प्रतिकृतीचा फोटो खुद्द आयसीसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला होता. यादिवशी राजपथवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल ३०,००० लोकांसोबत योगासने केली होती. आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे योग कार्यकमला हजेरी लावली. यावेळी मोदींनी ४०,००० लोकांसोबत योगासने केली.