महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वकरंडकाच्या इतिहासात जे भारत-पाकला जमलं नाही ते बांगलादेशने करुन दाखवलं

बांगलादेशने केलेल्या या पराक्रमामुळे त्या संघाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. याव्यतिरीक्त बांगलादेशने एक विक्रम केलाय जो भारत आणि पाकिस्तानलाही जमलेला नाही.

बांगलादेशने केला विक्रम

By

Published : Jun 3, 2019, 3:35 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत किंग्जस्टन ओव्हल, लंडन येथे रंगलेल्या रोमांचक सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने केलेल्या या पराक्रमामुळे त्या संघाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. याव्यतिरीक्त बांगलादेशने एक विक्रम केलाय जो भारत आणि पाकिस्तानलाही जमलेला नाही.

विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा पराभूत केले आहे. असे तो करणारा पहिला आशियाई संघ बनला आहे. यापूर्वी 2007 विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला हरवले होते.

आशियाई संघांपैकी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त एकच विजय मिळवता आला आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषकामध्ये आत्तापर्यंत 4 सामने झाले आहेत. यातील 1 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर 3 सामन्यात पराभव पत्करला आहे.भारताच्या रेकॉर्डप्रमाणेच पाकिस्तानचा रेकॉर्ड आहे.

विश्वचषकात बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 4 सामने झाले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details