टाँटन- आयसीसी विश्वकरंडकात आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात द कुपर असोसिएट कॉउंटी ग्रॉउंड, टाँटन येथे सामना झाला. रोमांचक झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या काही षटकांत मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानला ४१ धावांनी धूर चारली. सामन्यात १०७ धावांची खेळी केल्याबद्दल डेव्हिड वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय - आयसीसी
मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानला ४१ धावांनी धूर चारली. सामन्यात १०७ धावांची खेळी केल्याबद्दल डेव्हिड वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कर्णधार अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने पाकच्या गोलंदाजांनी चांगली धुलाई करत २२.१ षटकात १४६ धावांची आक्रमक सलामी दिली. आमिरने फिंचला ८२ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. आक्रमक सुरुवातीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया पाकला ३५० धावांपेक्षा जास्त धावांचे आव्हान देईल, असे वाटत होते. आमिरने भेदक गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची मधली फळी बाद केली. यामुळे, ऑस्ट्रेलियाचा संघ ४९ षटकात सर्वबाद ३०९ धावाच करू शकला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ५ आणि शाहिन आफ्रिदीने २ विकेट घेत चांगली गोलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाचा आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची खराब सुरुवात झाली. फखर झमान शून्यावर बाद झाला. इमाम उल हक ५३, बाबर आझम ३०, मोहम्मद हाफिज ४६ आणि सर्फराज अहमत ४० आणि वाहब रियाजने ४५ धावा केल्या. परंतु, स्टार्कने भेदक गोलंदाजी करत पाकच्या आशेवर पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात कमिन्सने ३, स्टार्क आणि रिचर्डसनने २ विकेट घेतल्या.