मुंबई - आयपीएलचे १२ वा मोसम २३ मार्चपासून सुरु होणार आहे. यापूर्वी सर्वच संघानी मैदानावर सराव कारयला सुरूवात केली आहे. मुंबई इंडियन्सचा संघही वानखेडे मैदानावर घाम गाळताना दिसला. यावेळी मुंबईत नव्याने दाखल झालेला युवराज सिंग वानखेडेवर पाऊल ठेवताच आपल्या जुन्या आठवणीत रमला. आयपीएलमध्ये मुंबईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत २४ मार्चला याच वानखेडे मैदानावर रंगणार आहे.
मुंबईच्या वानखेडेवर पोहचताच युवराजची 'ती' आठवण झाली जागी
आयपीएलच्या १२ व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्स संघाने युवराज सिंगला १ कोटी रुपयांच्या बोलीसह संघात दाखल करून घेतले आहे.
yuvraj singh
युवराजची 'ती' आठवण म्हणजे २०११ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी. श्रिंलंकेविरुद्द खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवत तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले होते. या सामन्यात युवराजने नाबाद २१ धावांची खेळी केली होती. तसेच तो विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीरही ठरला होता. मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात युवी आपल्या २०११ विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देताना दिसला.