मुंबई - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. त्याचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून युवराजचा फोटो सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नुकतीच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये युवराज सिंह सहभागी होता. या स्पर्धेचे विजेतेपद इंडिया लिजेंड्सने पटकावले. इंडिया लिजेंड्सच्या विजयात युवराजने मोलाची भूमिका निभावली. स्पर्धा संपताच युवराज प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हाकिम यांच्याकडे पोहोचला. तेव्हा हाकिम यांनी युवीच्या लूकचा कायापालट केला.
हाकिम यांनी केलेला नव्या लूकचा फोटो युवराजने त्याच्या इन्साग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या लूकमध्ये युवराज 'रॉकस्टार' प्रमाणे पाहायला मिळत आहे.