नवी दिल्ली - भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून निवृत्त झाला. त्यानंतर कॅनडातील ग्लोबल टी -२० लीग (जी -२०) स्पर्धेच्या दुसऱ्या लिलावासाठी टोरांटो नॅशनल टीमने युवराजला विकत घेतले होते. आणि आता तो एका नव्या वेगळ्या भूमिकेत समोर आला आहे. युवराजचा नोकरी मागतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे.
युवराज म्हणतो, या तुफानाला कोणी नोकरी देता का?..पाहा व्हिडिओ - yuvraj singh
युवराजचा नोकरी मागतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे.
युवराज
'द ऑफिस इंडिया' या हॉट स्टार स्पेशल सीरिजमध्ये युवराजने अभिनय केला आहे. या व्हिडिओत युवराज एका मुलाखतीला जात असल्याचे दाखवले आहे. मुलाखतीमध्ये युवराज आणि मुलाखत घेणाऱ्यामध्ये विनोदी संभाषण दाखवण्यात आले आहे.
युवराजने काही दिवसांपूर्वी कॅनडातील ग्लोबल जी टी -२० मध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती, त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तो या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. युवराज या स्पर्धेत खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू असणार आहे.