नवी दिल्ली - भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने विश्वकरंडक स्पर्धेत 5 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. यावर 'सिक्सर किंग' युवराज सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने 'हिटमॅन यू लिजेंड! कहा है, मॅन दी ऑफ सीरीज की ट्रॉफी' अशा शब्दात त्याने ट्विट करत रोहितला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'अरे कुठे आहे ती, मालिकावीरची ट्रॉफी'; 'सिक्सर किंग' युवराजच्या 'हिटमॅन' रोहितला अनोख्या शुभेच्छा - world records
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने विश्वकरंडक स्पर्धेत 5 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. यावर 'सिक्सर किंग' युवराज सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने 'हिटमॅन यू लिजेंड! कहा है, मॅन दी ऑफ सीरीज की ट्रॉफी' अशा शब्दात त्याने ट्विट करत रोहितला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित शर्माने आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत कुमार संगकाराचा 4 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला. त्यामुळे रोहितवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. युवराजनेही रोहितचे कौतूक केले आहे. त्याने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, रोहित शर्मा एक लिंजेड आहे. आता मॅन ऑफ दी सीरीजची ट्रॉफी कुठे आहे असे विचारले आहे. तसेच त्याने हा विक्रम करणारा रोहित पहिलाच असल्याचे सांगितले.
रोहित शर्मा याने विश्वकरंडक स्पर्धा 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि आता श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकले आहेत. युवराज सिंह हा भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू असून त्याने काही दिवसापू्र्वीच निवृत्ती स्वीकारली होती. युवराज हा एकाच षटकात ६ सिक्सर लगावणारा खेळाडू आहे.