नवी दिल्ली - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला आणखी एक नवीन चॅलेंज दिले आहे. या नव्या चॅलेंजमध्ये तो डोळ्यावर काळी पट्टी बांधून लाटणीने चेंडूला टोलवत आहे.
युवराजने सचिनला हा चेंडू 100 वेळा टोलवण्याचे चॅलेंज दिले आहे. युवी म्हणाला, "मास्टर, तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर बरेच विक्रम मोडले आहेत. पण आता स्वयंपाकघरात माझ्या शतकाचा विक्रम तुम्हाला मोडायचा आहे. माफ करा, प्रक्रिया मोठी असल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शेअर केला नाही. मी आशा करतो की आपण स्वयंपाकघरातील इतर वस्तू मोडणार नाहीत."