नवी दिल्ली- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड विरुध्द होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी कर्णधार विराटने न्यूझीलंडच्या संघाला उपांत्य फेरीत धुळ चारली होती. होय हे खरे आहे. विराटने २००८ सालच्या अंडर १९ विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंड संघावर ३ गडी राखून विजय मिळवला होता. योगायोग म्हणजे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच होता. त्यामुळे यंदाच्या उपांत्य सामन्यात विराट पुन्हा विल्यमसनवर भारी पडणार का हे पाहावे लागेल.
२००८ च्या अंडर १९ वर्षीय विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले. या विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताची लढत न्यूझीलंड संघाशी झाली. तेव्हा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा होता. पुन्हा आता ११ वर्षानंतर विराट केन विल्यमसनला धुळ चारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर केन विल्यमसन २००८ साली झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.