मुंबई -भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला आयपीएलमध्ये दुखापत झाली. त्यामुळे तो आयपीएलमधील शेवटचे काही सामने खेळू शकला नाही. आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पोहोचला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर या दौऱ्यात साहाला कसोटी संघात संधी मिळू शकते. याचे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत.
एका संकेतस्थळाशी बोलताना गांगुली यांनी सांगितले की, बीसीसीआय कशाप्रकारे काम करते हे लोकांना माहित नाही. यामुळे अनेक अफवा, टीका होत राहतात. बीसीसीआय, प्रशिक्षक, फिजिओ आणि खुद्द साहाला सुद्धा माहिती आहे की तो दुखापतग्रस्त आहे. पण असे असले तरी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेआधी फिट होईल. दुखापतीमुळे तो एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघाचा सदस्य नाही.
रोहितबद्दल काय म्हणाले गांगुली