महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

...यासाठी आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनी नाही

धोनीचा समावेश न करण्याचे कारण निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी उलगडले आहे. 'धोनी सध्या अमेरिकेमध्ये आहे आणि त्याने आफ्रिका दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे कळवले होते. याच कारणासाठी त्याची संघात निवड झालेली नाही.' असे प्रसाद यांनी सांगितले आहे.

...यासाठी आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनी नाही

By

Published : Aug 30, 2019, 4:45 PM IST

नवी दिल्ली -टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या संघात आज अखेरचा कसोटी सामना रंगणार आहे. या मालिकेनंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताच्या टी -२० संघाची घोषणा केली. या संघामध्ये धोनीला स्थान देण्यात आलेले नाही.

धोनीचा समावेश न करण्याचे कारण निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी उलगडले आहे. 'धोनी सध्या अमेरिकेमध्ये आहे आणि त्याने आफ्रिका दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे कळवले होते. याच कारणासाठी त्याची संघात निवड झालेली नाही.' असे प्रसाद यांनी सांगितले आहे.

निवड झालेल्या संघात महेंद्रसिंह धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. धोनीच्या जागी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. १५ जणांच्या या संघात भावांच्या दोन जोड्यांचा (हार्दिक पंड्या-कृणाल पंड्या आणि राहुल चहर-दीपक चहर) समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. टी-२० मालिकेसाठी संघ निवडताना आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करूनच खेळाडूंची निवड केल्याची शक्यता आहे.

टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वृषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

ABOUT THE AUTHOR

...view details