किंगस्टन - भारत विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३१८ धावांनी वेस्ट इंडीजचा पराभव झाला. या पराभवानंतर यजमान विडींजच्या संघाने मालिका बरोबरीत सोडण्यासाठी कंबर कसली आहे. भारत विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विडींजचा प्रमुख खेळाडू किमो पॉल तंदुरुस्त झाला आहे. यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
किमो पॉल याच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. पॉलच्या ठिकाणी मिग्युएल कमिन्सला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली होती. आता दुसऱ्या कसोटीसाठी पॉल तंदुरुस्त झाल्यामुळे कमिन्सला संघाबाहेर जावे लागले आहे.
IND VS WI : कोहली अॅन्ड कंपनीची क्रुझवर धम्माल मस्ती, फोटो व्हायरल