मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या निर्णायक कसोटीत वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसअखेर 6 गडी गमावत 137 धावा केल्या आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व राखत तिखट मारा केला. विंडीजचा संघ अजूनही 232 धावांनी पिछाडीवर असून खेळ थांबला तेव्हा कर्णधार जेसन होल्डर 24 आणि शेन डावरिच 10 धावांवर खेळत होते.
ENGvsWI : अँडरसन आणि ब्रॉडमुळे विंडीजची खराब सुरूवात
इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट ब्रॉडच्या गोलंदाजीवर रुटकडे झेल देत माघारी परतला. कॅम्पबेल आणि शाई होप यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट ब्रॉडच्या गोलंदाजीवर रुटकडे झेल देत माघारी परतला. कॅम्पबेल आणि शाई होप यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू जोफ्रा आर्चरने ही जोडी फोडत विंडीजला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर अँडरसनने होप आणि ब्रुक्सला माघारी धाडले. 73 धावांवर विंडीजचा निम्मा संघ माघारी परतला होता.
तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 369 धावा केल्या. ओली पोपचा 91 धावांवर गॅब्रिअलने त्रिफळा उडवला. मात्र दुसऱ्या बाजूने जोस बटलरने एक बाजू लावून धरत इंग्लंडची झुंज सुरु ठेवली. बटलर 67 धावांवर माघारी परतल्यानंतर इंग्लंड लवकर बाद होईल असे वाटत होते. मात्र, स्टुअर्ट ब्रॉड धावून आला. त्याने 45 चेंडूत 62 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विंडीजकडून पहिल्या डावात केमार रोचने 4 बळी घेत 200 बळींचा टप्पा गाठला. त्याला शेनॉन गॅब्रिअल आणि रोस्टन चेसने प्रत्येकी 2 तर जेसन होल्डरने एक बळी घेत उत्तम साथ दिली. या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.