सेंट लुसिया - विंडिजचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलने समलैंगिकतेची टीका केल्यावर जो रुटची बिनशर्त माफी मागितली आहे. आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शॅनोन गॅब्रियलवर ४ एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले ४ सामने तो खेळू शकणार नाही.
स्टम्प माईकमध्ये रुट आणि शॅनोन यांच्यात झालेली बाचाबाची कैद झाली आहे. त्यानंतर रुटने समलैंगिक असणे काही चुकीचे नसते अशी प्रतिक्रिया दिली. शॅनोनने त्याची चुकी मान्य केली आहे. आयसीसी मॅच रेफरी जेफ क्रो यांनी ही शिक्षा दिली आहे. मैदानातील पंच राड टकर आणि कुमार धर्मसेना यांनी रेफरीकडे तक्रार केली होती.