बंगळुरू- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि निर्णायक सामना जिंकून मालिका २-१ ने खिशात घातली. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये खेळवण्यात आलेल्या अखेरचा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून जिंकला. दरम्यान, या सामन्यात एका चाहत्याच्या पोस्टरकडे सर्वांचे लक्ष गेले आणि या पोस्टरची दखल खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने देखील घेतली आहे.
घडलं अस की, भारत-ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या एका चाहत्याने, मी देखील बुमराहसारखी गोलंदाजी करु शकतो, अशा आशय लिहलेला पोस्टर हातात घेऊन उभा होता. तेव्हा कॅमेरामनने त्या पोस्टरकडे लक्ष वेधले. तेव्हा त्या चाहत्याची दखल आयसीसीने घेतली.
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरुन त्या चाहत्याचा पोस्टर घेतलेला फोटो ट्विट केला आणि चाहत्यालाच प्रश्न केला की, तु जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करू शकतो तर आम्हाला त्याचा व्हिडिओ पुरावा हवा आहे. तसेच या फोटोसोबत आयसीसीने स्माईली इमोजी पोस्ट केला आहे.