महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

...म्हणून धोनी ऐवजी पंतला संधी.. प्रसाद यांचे स्पष्टीकरण, साहाविषयीही केले भाष्य

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पंतसारख्या उद्योमुख खेळाडूंना परिपक्व करण्याचा आमचा मानस असून यासाठी त्याला संघात जागा देण्यात आली असल्याचे सांगितले.

...म्हणून धोनी ऐवजी पंतला संधी दिली, प्रसाद यांचे स्पष्टीकरण, साहाविषयीही केले भाष्य

By

Published : Jul 21, 2019, 6:13 PM IST

मुंबई- आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने तिन्ही प्रकारात महेंद्रसिंह धोनीच्या ठिकाणी ऋषभ पंतला जागा दिली आहे. संघाच्या घोषणेनंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पंतसारख्या उद्ययोमुख खेळाडूंना परिपक्व करण्याचा आमचा मानस असून यासाठी त्याला संघात जागा देण्यात आली असल्याचे सांगितले.

धोनी या दौऱ्यासाठी उपलब्ध नसून त्याठिकाणी पंतला तिन्ही प्रकारात जागा देण्यात आली. विश्वकरंडक स्पर्धेसाठी आम्ही चांगली संघबांधणी केली होती. त्यानंतर आताही आम्ही नविन खेळाडूंना संघात सहभागी करुन संघबांधणी करत आहोत. विश्वकरंडकात पंतची कामगिरी इतकी वाईटही नव्हती. ज्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात यावे, याकारणाने आम्ही त्याला संघात सामिल केले, असे प्रसाद म्हणाले.

साहाला संघात जागा देण्यात आली याविषयी बोलताना प्रसाद म्हणाले, आमचा एक नियम आहे, त्यानुसार एखादा अनुभवी खेळाडू जखमी झाल्यास, त्याला संघात वापसीसाठी संधी देण्यात यावी, यामुळे साहाला संघवापसी करण्यात आली, असे त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details