चेन्नई -इंग्लंडविरुद्ध उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची रणनिती ठरवण्यासंदर्भात भारतीय खेळाडूंची बैठक झाली. या बैठकीत नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरु आहे, त्यावरही चर्चा झाली. प्रत्येक खेळाडूने आपले मत मांडले, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले.
आज (ता.४) व्हर्चुअल पत्रकार परिषदेत विराटला शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, 'भारतीय संघाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. प्रत्येकाने या मुद्यावर आपले मत मांडले.'
दरम्यान, शेतकरी आंदोलनासंदर्भात नेमकी काय चर्चा झाली ? याबद्दल सविस्तर माहिती देण्याचे विराटने टाळले.
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि युवापर्यावरणकार्यकर्तीयांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे ट्विट केले. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विटचा सपाटा लावला. यात माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, प्रग्यान ओझा यांनी ट्विट केले आहे.