महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : लंकेविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाचे गुवाहाटीत आगमन

By

Published : Jan 3, 2020, 4:22 PM IST

कर्णधार कोहलीने अद्याप गुवाहाटी गाठले नसले, तरी श्रेयस अय्यर, रिषभ पंत यांसारखे स्टार खेळाडू पहिल्या टी-२० सामन्यासाठी दाखल झाले आहेत. ३ जानेवारीला सकाळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर तर, दुपारपर्यंत मनीष पांडे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी गुवाहाटी गाठले होते.

Watch: Team India arrives in Guwahati for 1st T20I against Sri Lanka
VIDEO : लंकेविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाचे गुवाहाटीत आगमन

गुवाहाटी -भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी ५ जानेवारीला गुवाहाटी येथे रंगणार असून भारतीय संघातील काही खेळाडू येथे दाखल झाले आहेत.

टीम इंडियाचे गुवाहाटीत झाले स्वागत

हेही वाचा -बाद दिल्यानंतर शुबमनने वापरले अपशब्द, मग पंचांनीही बदलला निर्णय!

कर्णधार कोहलीने अद्याप गुवाहाटी गाठले नसले, तरी श्रेयस अय्यर, रिषभ पंत यांसारखे स्टार खेळाडू पहिल्या टी-२० सामन्यासाठी दाखल झाले आहेत. ३ जानेवारीला सकाळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर तर, दुपारपर्यंत मनीष पांडे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी गुवाहाटी गाठले होते. रिषभ पंत, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे येथील गोपीनाथ बर्दोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्या चाहत्यांची गर्दी उसळली होती. विमानतळावर त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विमानतळावरून ते हॉटेल रेडिसन ब्लू येथे पोहोचले. पहिल्या सामन्यासाठी २७,००० तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

भारत श्रीलंका संघातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिला टी-२० सामना, ५ जानेवारी, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता
  • दुसरा टी-२० सामना, ७ जानेवारी, इंदूर, सायंकाळी ७ वाजता
  • तिसरा टी-२० सामना, १० जानेवारी, पुणे, सायंकाळी ७ वाजता

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.

टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -

लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणातिलाका, अविष्का फर्नांडो, अँजलो मँथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भनुका राजपक्षे, ओशाडा फर्नांडो, वनिंदु हसरंगा, लहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षन संदाकन आणि कसुन रजीता.

ABOUT THE AUTHOR

...view details