हैदराबाद - भारत आणि बांगलादेश संघातील ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यास सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यांसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कारण या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली.
भारतीय संघ प्रथमच दिवस-रात्र कसोटी खेळणार असल्याने, खेळाडूंमध्येही उत्सुकता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, भारतात होणारा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. काय विशेष आहेया सामन्यात. एकतर हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. दुसरा म्हणजे, गुलाबी चेंडू. काय खास आहे त्या गुलाबी चेंडूत 'ईटीव्ही भारत' चे क्रीडा संपादक दिपांशु मदन यांचा खास रिपोर्ट...