महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चेन्नईत दाखल - इंग्लंडचा भारत दौरा २०२१ न्यूज

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पॅटरनिटी सुट्टीनंतर संघासोबत जोडला गेला आहे. कोहली काल ( ता. २७) उशिरा रात्री चेन्नईमध्ये दाखल झाला.

watch india captain virat kohli arrives in chennai
VIDEO : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चेन्नईत दाखल

By

Published : Jan 28, 2021, 10:52 AM IST

चेन्नई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पॅटरनिटी सुट्टीनंतर संघासोबत जोडला गेला आहे. विराट काल ( ता. २७) उशिरा रात्री चेन्नईमध्ये दाखल झाला. आता विराट पुढील सहा दिवस क्वारंटाइन राहणार आहे.

विराट कोहली चेन्नईत दाखल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिले दोन सामने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.

उभय संघातील या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ देखील चेन्नईत दाखल झाला आहे. सर्व खेळाडू बायोबबलमध्ये असून यात त्यांना बाहेर फिरण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. क्वारंटाइन दरम्यान, त्यांची अनेकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर खेळाडूंना सरावास परवानगी मिळेल.

दरम्यान, विराट कोहली तिची पत्नी अनुष्का गरोदर असल्याने, तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना संपल्यानंतर भारतात परतला होता. अनुष्काने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. याची माहिती विराट आणि अनुष्का यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

हेही वाचा -केरळ उच्च न्यायालयाची विराटला कायदेशीर नोटीस

हेही वाचा -इंग्लंडच्या संघाचे चेन्नईत आगमन, मुंबईकरही चेन्नईत पोहोचले

ABOUT THE AUTHOR

...view details