महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्मिथ, वॉर्नर नसल्याने जिंकलात, पाक प्रशिक्षकांनी टीम इंडियाला डिवचले - स्मिथ आणि वॉर्नर नसल्याने भारताला विजय मिळाला वकार युनूस याचं मत

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याच्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी, २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, भारतीय संघाला स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर संघात नसल्याने विजय मिळवता आला, असे म्हटलं आहे.

waqar younis says indian won test series in australia due to the absence of steve smith and david warner
स्मिथ, वॉर्नर नसल्याने जिंकलात, पाक प्रशिक्षकांनी टीम इंडियाला डिवचले

By

Published : Apr 7, 2020, 11:34 AM IST

मुंबई- भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असून अनेकदा पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू भारतीय खेळाडूंवर किंवा संघांवर आगपाखड करत असल्याचं पाहायला मिळाले आहेत. सद्या कोरोनामुळे संपूर्ण जगासह क्रीडा विश्व ठप्प आहे. या काळात देखील पाकिस्तानच्या खेळाडूने भारतीय संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याच्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी, २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, भारतीय संघाला स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर संघात नसल्याने विजय मिळवता आला, असे म्हटलं आहे.

भारतीय संघाने २०१८ साली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी करत ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. पण या विजयाचे श्रेय वकार युनूस यांनी भारतीय संघाला दिलेले नाही.

याबाबत वकार युनूस यांनी सांगितले की, 'भारताने २०१८ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत स्मिथ आणि वॉर्नर हे दोन मुख्य खेळाडू नव्हते. जर हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या संघात असते तर कदाचित निकाल वेगळा लागण्याची शक्यता होती.'

दरम्यान, स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्यामुळे एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यामुळे त्या दोघांची निवड ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आली नव्हती.

खुशखबर!..7 एप्रिलपासून होणार क्रिकेट सुरू..भारत सरकारचा निर्णय

टी-२० विश्वकरंडक नियोजित वेळेत होणार, यजमान ऑस्ट्रेलियाचा विश्वास

ABOUT THE AUTHOR

...view details