मुंबई - भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग, नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तो हटके फोटो, व्हिडिओ शेअर करून त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. त्याने शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो माझी तीन तत्व आहेत. मी प्रथम हात जोडतो, त्यानंतर निवेदन करतो आणि जर ऐकलं नाही तर दे दणादण करतो, असे म्हणत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक राज्यांनी तर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना पोलीस लाठीचा प्रसाद देत आहे. या सर्व घटनाच्या पार्श्वभूमिवर सेहवागने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये सेहवाग प्रथम मी हात जोडून विनंती करतो, नंतर मी निवेदन करतो. ते ऐकले नाही तर शेवटी मी दे दणादण करतो, असे म्हणताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सेहवाग आपल्या तिन्ही तत्वाची अॅक्टिंग करुन दाखवत आहे. प्रथम तो हात जोडतो, त्यानंतर तो निवेदन दिल्यासारखे हात पुढे करतो आणि शेवटी दे दणादणासाठी हातात बॅट घेऊन हवेत जोरात फिरवतो.