मुंबई - भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. 'कसोटी क्रिकेट म्हणजे चार दिवसाचं चादणं नव्हे', असे सेहवागने म्हटले. रविवारी रात्री बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यानंतर सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा -IND Vs AUS : टीम इंडियाला धक्का, रोहित शर्माला दुखापत
सेहवागने पाच दिवसांच्या कसोटी सामन्याची तुलना 'बेबी डायपर'शी केली. 'हा प्रकार निरूपयोगी ठरला तरच, या दोघांना बदलले गेले पाहिजे', असे सेहवाग म्हणाला. दिवस-रात्र कसोटी सामन्यावरही सेहवागने आपले मत दिले. 'डे-नाईट टेस्ट मॅच पुढे जाण्याचा मार्ग आहे. आपण ते ईडन गार्डन्समध्ये पाहिले आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचे श्रेय दादा म्हणजेच सौरभ गांगुलीला दिले पाहिजे', असे सेहवागने म्हटले.
'मी नेहमीच बदलाचे समर्थन केले आहे. पहिल्या टी -२० सामन्यात मी भारताचा कर्णधार होतो आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा मी सदस्य आहे. पण, पाच दिवसाची कसोटी हा एक रोमान्स आहे. कसोटी संपलेली नाही. कसोटी क्रिकेट हा १४३ वर्षांचा तंदुरुस्त माणूस आहे', असेही सेहवाग म्हणाला.