मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यात बेस्ट कोण ? यावर चर्चा थांबवायला हवी, असे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने म्हटले आहे. विराट विषयी बोलताना त्याने गमतीशीरपणे उत्तर दिले. तो म्हणाला, विराट आणि सचिन या दिग्गजांना गोलंदाजी करणार नाही. कारण त्याचे विक्रम चमत्कारिक आहेत.
कोहलीला गोलंदाजी नको रे...बाबा, त्याचे विक्रम जणू 'अजूबाच'- वॉर्न
वॉर्न म्हणाला, विराट आणि सचिन दोघे वेगळे आणि महान खेळाडू आहेत. त्या दोघांपैकी मी एकाची निवड करू शकत नाही. माझ्यासाठी तर डॉन ब्रॅडमनही सर्वोत्तम आहेत. विदेशातला विचार करायचा झाल्यास विव रिचर्डस सर्वात बेस्ट खेळाडू आहे.

वॉर्न म्हणाला, विराट आणि विव रिचर्डस हे झटपट क्रिकेटमधील गुणवान खेळाडू आहेत. विराटचे विक्रम अजूबाच आहेत. तो किती चांगला खेळाडू आहे जे त्याच्या विक्रमांवरुन समजते. जेव्हा तो खेळत असतो तेव्हा त्याचे मूल्यमापन करू शकत नाही असे म्हणत त्याच्यावर वॉर्नने कौतुकाचा वर्षाव केला.