महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराटला बीसीसीआयचा दणका ! 'देव'ने निवडलेलाच प्रशिक्षक स्वीकारावा लागणार - Virat Kohli

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत कर्णधार विराटची पसंत नापसंतीचा विचार करण्यात येणार नाही. अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे यंदा कोहलीला कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेला प्रशिक्षक स्वीकारावा लागणार आहे.

विराटला बीसीसीआय दणका ! 'देव'ने निवडलेलाच प्रशिक्षक स्वीकारावा लागणार

By

Published : Jul 18, 2019, 4:06 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघाचा प्रशिक्षक नेमण्यासाठी कपिल देव यांच्यासह तिघांची सल्लागर समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात निवडण्यात येणाऱ्या प्रशिक्षाच्या निवडीत कर्णधार विराट कोहलीचे मत विचारात घेण्यात येणार नाही.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत कर्णधार विराटची पसंत नापसंतीचा विचार करण्यात येणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे यंदा कोहलीला कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेला प्रशिक्षक स्वीकारावा लागणार आहे.

रवी शास्त्री यांच्या निवडीदरम्यान, विराट कोहलीला मत विचारण्यात आले होते. मात्र, यावेळी तसे होणार नाही. दरम्यान, 2017 मध्ये विराटच्या अनिल कुंबळे यांना पदाचा कालावधी वाढवून न देण्याच्या मताला प्राधान्य देण्यात आले होते. यामुळे कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे समोर आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details