मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी ५ एप्रिल, रविवारी म्हणजे आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनला भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने पाठिंबा दर्शवला आहे.
विराट कोहलीने ट्विट करुन आपला पाठिंबा दर्शवला आहे. विराट म्हणतो, 'स्टेडियमची जान चाहते असतात. भारताची ताकद देशातील जनता आहे. चला तर मग जगाला दाखवून देऊ, आज रात्री ९ वाजता. आपण आपल्या आरोग्य वॉरियर्सच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, टीम इंडिया'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे.