महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Birthday : विराट कोहलीचे 'हे' खास १० विक्रम वाचाच.... - विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यूज

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

virat kohli turns 32 here are the 10 world records made by him
Virat Kohli Birthday: विराट कोहलीचे 'हे' खास १० विक्रम वाचाच....

By

Published : Nov 5, 2020, 4:03 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १९व्या वर्षी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्याने पदार्पणाचा सामना श्रीलंकेविरुद्ध दाम्बुला येथे खेळला.

विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी -

विराटने आपल्या आक्रमक फलंदाजीद्वारे जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने भारताकडून ८६ कसोटी, २४८ एकदिवसीय आणि ८२ टी-२० सामने खेळले आहेत. यात विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. तर कसोटीत 7 हजार २४० धावा जमवल्या आहेत. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे २ हजार ७९४ धावा आहेत.

विश्वविजेत्या संघाचा विराट सदस्य -

२०११ सालच्या विश्वकरंडक आणि २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात विराट होता. त्यानंतर २०१४ साली महेंद्रसिंह धोनीकडून त्याने कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले तर जानेवारी २०१७ साली मर्यादीत षटकांच्या संघाचा देखील तो कर्णधार झाला.

कोहलीचे 'विराट' १० विक्रम -

  • विराट कोहलीच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८ हजार (१७५ डावात) , ९ हजार (१९४ डावात), १० हजार (२०५ डावात), ११ हजार (२२२ डावात) धावा पूर्ण करण्याचा रेकार्ड आहे.
  • विराट कोहलीने एकदिवसीय मालिकामध्ये ७ वेळा ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. हा एक विश्व विक्रम आहे.
  • लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६ शतकं झळकावली आहेत.
  • कर्णधार या नात्याने पहिल्या तीन कसोटी डावात शतक झळकावणारा विराट पहिला फलंदाज आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सलग चार मालिकामध्ये चार द्विशतक झळकावणारा विराट एकमेव फलंदाज आहे.
  • कोहली टी-२० किक्रेटमध्ये एका वर्षात ६०० हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीने सर्वात जलद ८ हजार धावा केल्या आहेत.
  • कसोटी सामन्यात विराटने कर्णधारपद सांभाळत ७ वेळा २०० हून अधिक धावा केल्या आहेत. हा एक विश्वविक्रम आहेत
  • विराट श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाविरूद्ध एकदिवसीय सामन्यात सलग ३ शतकं झळकवणारा जगातील एकमात्र फलंदाज आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०च्या सरासरीने २० हजाराहून अधिक धावा करणारा विराट एकमात्र फलंदाज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details