बंगळुरु -चेन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी खेळण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १ धावेने थराराक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात बंगळुरूच्या विजयापेक्षा चर्चा होत आहे, ती चेन्नईचा कर्णधार धोनीच्या वादळी खेळीची. धोनीने धडाकेबाज फलंदाजी करत ४८ चेंडूत ८४ धावांची खेळी साकारली. त्याची ही खेळी पाहून बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीही घाबरला होता.
धोनीची फलंदाजी पाहून आम्ही घाबरलो - विराट कोहली
बंगळुरूविरुद्ध धोनीने धडाकेबाज फलंदाजी करत साकारली ४८ चेंडूत ८४ धावांची खेळी
सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, '१९ व्या षटकापर्यंत आमचे गोलंदाज शानदार गोलंदाजी करत होते. मात्र २० व्या षटकामध्ये उमेश यादवच्या गोलंदाजीवर धोनीने जी काही तुफानी फलंदाजी केली ती पाहुन आम्ही घाबरलो होतो.'
धोनी ज्या तडफेने फंलदाजी करत होता, ते पाहुन वाटत होते की, सामना चेन्नईच जिंकतेय. मात्र अखेरच्या चेंडूत २ धावांची गरज असताना धोनीने मोठा फटका मारण्याचा नादात चेंडू चुकवला. शेवटच्या चेंडूवर एकही धाव न घेता आल्याने चेन्नईला हातात आलेला सामना गमावाव लागाला. धोनीने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ७ खणखणीत षटकार ठोकले होते. तसेच ८४ ही धावसंख्या धोनीची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्याही ठरली.