मोहाली- चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी करताना भारताचा ४ गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने डीआरएसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना यामध्ये सातत्येची कमी असल्याचे म्हटले आहे.
डीआरएसच्या निर्णयावर कोहली नाराज; म्हणाला...
विराटने डीआरएसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना यामध्ये सातत्येची कमी असल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४४ षटकामध्ये चहलच्या गोलंदाजीवर अॅश्टन टर्नरचा झेल पकडल्याचे अपील पंतने केले. पंचांनी ते फेटाळून लावले. यानंतर पंतच्या सांगण्यावरुन विराट कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर चेंडू बॅटची किंचीतशी कड घेताना दिसून येत होता. यातूनही काही होत स्पष्ट कळत नसल्यामुळे स्निको-मीटरद्वारे आवाज तपासण्यात आला. यामध्ये स्पष्ट हालचाल दिसून येत होती. परंतु, यानंतरही पंचांनी अॅश्टन टर्नरला नाबाद दिले. या निर्णयानंतर भारतीय संघासह विराट कोहलीनेही आश्चर्य व्यक्त केले.
अॅश्टन टर्नरने यानंतर ४३ चेंडूत ८४ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विराट या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाले, डीआरसचा निर्णय हैराण करणारा होता. यामध्ये सातत्येची कमी आहे. डीआरएस आता प्रत्येक सामन्यात चर्चेचा विषय बनत चालला आहे. यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.