लंडन- भारतीय संघातील मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने हा निर्णय विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने घेतला असल्याचे बोलले जात आहे. रायडूच्या निवृत्तीवर भारतीस संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, तू चांगला माणूस आहे. यानंतर सोशल मीडियावर कर्णधार कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अंबाती रायडूला वगळण्यात आले. तेव्हा रायडूने उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्पर्धेत शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाल्याने त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यानंतर तरी रायडूची संघात वर्णी लागणार का? अशी चर्चा होती. मात्र, रायडूच्या ठिकाणी मयांक अग्ररवाल याला संधी देण्यात आली. तेव्हा नाराज असलेल्या रायडूने सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.