महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'क्युट' आजी भारताच्या सर्व सामन्यात मैदानात दिसणार; विराटने दिलेले 'वचन' पाळले

बांगलादेश विरुध्दच्या सामन्यानंतर स्टार झालेल्या आजीबाईला विराटने पुढच्या सामन्यातही तुम्हाला आम्ही मैदानात पाहू इच्छित असल्याचे सांगितले. तेव्हा आजी चारुलता यांनी पुढील सामन्याचे तिकिट नसल्याचे सांगत पुढील सामन्यात येऊ शकणार नसल्याचे सांगितले. तेव्हा विराटने आजी चारुलता यांना तुम्हाला मी पुढच्या सामन्याचे तिकिट देतो, असे आश्वासन दिले होते.

'क्युट' आजी भारताच्या सर्व सामन्यात मैदानात दिसणार; विराटने दिलेले 'वचन' पाळले

By

Published : Jul 4, 2019, 5:44 PM IST

लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश सामन्यात आणि सामन्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या त्या ८७ वर्षीय चारुलता पटेल या आजी. त्यांनी भारतीय संघाला मोठ्या उत्साहात पिपाणी वाजवत पाठिंबा दिला. त्यांचा उत्साह पाहून कॅमेरामनला अनेकवेळा आजीबाईवर कॅमेरा 'फोकस' करावा लागला. कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर काही तासातच चारुलता पटेल सोशल मीडियामध्ये ट्रेडिंगमध्ये आल्या. सामन्यानंतर कर्णधार कोहली आणि रोहित शर्माने आजीबाईंची भेट घेतली. त्या भेटीत विराटने आजीला एक वचन दिले. यानंतर काही तासातच विराटने ते वचन पूर्ण केले आहे.

बांगलादेश विरुध्दच्या सामन्यानंतर स्टार झालेल्या आजीबाईला विराटने पुढच्या सामन्यातही तुम्हाला आम्ही मैदानात पाहू इच्छित असल्याचे सांगितले. तेव्हा आजी चारुलता यांनी पुढील सामन्याचे तिकिट नसल्याचे सांगत पुढील सामन्यात येऊ शकणार नसल्याचे सांगितले. तेव्हा विराटने आजी चारुलता यांना तुम्हाला मी पुढच्या सामन्याचे तिकिट देतो, असे आश्वासन दिले.

हे आश्वसन दिल्याच्या काही तासातच विराटने आपण दिलेला शब्द पाळला पुढील सामन्याची तिकिटे आजीला दिली आहेत. विराटने चारुलता आजीसाठी लीड्समध्ये होणारा श्रीलंकेविरुध्दचा सामना आणि उपांत्य फेरीच्या सामन्याची तिकीटे पाठवून दिली आहेत. याची माहिती चारुलता यांच्या नातीने दिली. दरम्यान, उद्योजक आनंद महिद्रा यांनी चारुलता आजींना उत्साह पाहून पुढील सामन्याचे तिकीट देणार असल्याचे जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details