नवी दिल्ली - टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडीजविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. या मालिकेनंतर, विराटसेना विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाने विंडीजविरुद्धची पहिली कसोटी जिंकली तर विराट महेद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना जिंकला तर, धोनीच्या कसोटीतील सर्वाधिक विजयी सामन्यांशी विराट बरोबरी करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीने कसोटीत ६० सामन्यांपैकी २७ सामने जिंकले आहेत. तर, विराटने ४६ सामन्यांतच २६ विजय संपादन केले आहेत.