गयाना -टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात होणारा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे या सामन्याची रंगत जरी चाहत्यांना पाहायला मिळाली नसली तरी, विराटच्या नृत्याचे सर्वजण साक्षीदार झाले.
गुरुवारी खेळवल्या गेलेल्या या सामन्यात फक्त १३ षटके टाकली गेली. या षटकाच्या दरम्यान विराटने चाहत्यांचे मनोरंजन केले. ब्रेकच्या नंतर पंचानी खेळाडूंना मैदानावर बोलावले. त्यावेळी पावसामुळे विराटने आपला मूड खराब होऊ दिला नाही. त्याने डीजेच्या तालावर नाचायला सुरुवात केली.