महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट अव्वल, तर रहाणेची आगेकूच - विराट कसोटी क्रमवारी न्यूज

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेने या क्रमवारीत आगेकूच केली असून तो आता आठव्या क्रमांकावर आला आहे.

virat kohli gain top position in icc test ranking
आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट अव्वल, तर रहाणेची आगेकूच

By

Published : Jan 25, 2020, 12:12 PM IST

दुबई -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या नव्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखले. तर, भारताचा कसोटी 'स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजाराने सहावे स्थान कायम राखले आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेने या क्रमवारीत आगेकूच केली असून तो आता आठव्या क्रमांकावर आला आहे.

हेही वाचा -INDvsNZ : टीम इंडियाचा विजयारंभ, न्यूझीलंडवर केली ६ गड्यांनी मात

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्याच्या अनुषंगाने ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बेन स्टोक्सने अष्टपैलू क्रमवारीत त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 'रँकिंग' मिळवली आहे. स्टोक्स आता दुसर्‍या क्रमांकावर आला असून फलंदाजांच्या क्रमवारीत तो दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज १६ व्या स्थानी आला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद २०० धावा केल्या होत्या.

फलंदाजांची क्रमवारी

कसोटी गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या स्थानावर न्यूझीलंडचा नील वॅग्नर आहे. तिसऱ्या क्रमांकावर विंडीजचा जेसन होल्डर आणि चौथ्या क्रमांकावर कॅगिसो रबाडा आहे.

गोलंदाजांची क्रमवारी

अष्टपैलू खेळाडूंच्या शर्यतीत विंडीजचा जेसन होल्डर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या स्थानावर बेन स्टोक्स, तिसर्‍या स्थानावर रवींद्र जडेजा आणि चौथ्या क्रमांकावर व्हर्नान फिलँडर आहे.

अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी

ABOUT THE AUTHOR

...view details