पुणे -गहुंजेवर सुरू असलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने २५४ धावांची आतषबाजी खेळी केली. या खेळीसोबत त्याने भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले.
हेही वाचा -'जंबो' सांभाळणार किंग्स इलेव्हन पंजाब संघाची धुरा
या सामन्यात विराटने ३३६ चेंडूंचा सामना करत नाबाद २५४ धावा रचल्या. त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत तब्बल ३३ चौकार लगावले. विराटने आत्तापर्यंत ७ द्विशतके रचली आहेत. त्याने सचिन आणि सेहवागचा सहा द्विशतकांचा विक्रम मोडित काढला. सर्वाधिक द्विशतके ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन हे अग्रस्थानी आहेत. त्यांनी कसोटीत १२ द्विशतके केली आहेत. तर, लंकेच्या कुमार संगकाराने ११ आणि विंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने ९ द्विशतके रचली आहेत.