महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॉर्डर यांच्या मोठ्या विक्रमाला कोहलीने पछाडले, यादीत मिळवले पाचवे स्थान

कसोटीतील अव्वल पाच यशस्वी कर्णधारांमध्ये विराटने स्थान मिळवले आहे. या कर्णधारांमध्ये विराटने पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज अ‌ॅलन बॉर्डर यांचा ३२ विजयांचा विक्रम मोडला. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून ३३ विजय आहेत. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (५३), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (४८), स्टीव्ह वॉ (४१) आणि वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड (३६) आघाडीवर आहेत.

बॉर्डर यांच्या मोठ्या विक्रमाला कोहलीने पछाडले, पंक्तीत मिळवले पाचवे स्थान

By

Published : Nov 24, 2019, 5:14 PM IST

कोलकाता -बांगलादेश विरुध्दचा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना भारताने १ डाव ४६ धावांनी खिशात घातला. या सामन्यात विराटने १३६ धावांची उपयुक्त खेळी करत पिंक बॉल कसोटीतील पहिला भारतीय शतकवीर होण्याचा मान मिळवला. या कामगिरीसोबत त्याने, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज अॅलन बॉर्डर यांना ही पछाडले आहे.

हेही वाचा -जाणून घ्या...'गुलाबी' कसोटीत टीम इंडियाने केलेले विश्वविक्रम

कसोटीतील अव्वल पाच यशस्वी कर्णधारांमध्ये विराटने स्थान मिळवले आहे. या कर्णधारांमध्ये विराटने पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज अ‌ॅलन बॉर्डर यांचा ३२ विजयांचा विक्रम मोडला. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून ३३ विजय आहेत. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (५३), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (४८), स्टीव्ह वॉ (४१) आणि वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड (३६) आघाडीवर आहेत.

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मुशिफिकूर रहीम (७४) आणि महमुदुल्लाह (३९) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारताच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकला नाही. उमेश यादवने घेतलेल्या ५ आणि ईशांत शर्माच्या ४ बळींच्या जोरावर भारताने हा सामना डावाने जिंकत मालिकाही खिशात घातली. भारताकडून दुसऱ्या डावात उमेश यादवने १४.१ षटकात ५३ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले. तर ईशांत शर्माने १३ षटकात ५६ धावा देत ४ गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून ७८ धावांत ९ बळी घेतलेल्या इशांत शर्माला सामनावीराचा किताब मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details