महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

किंग कोहलीने मैदानाच्या बाहेर केला मोठा विक्रम, सचिनला टाकले मागे - विराट कोहली

विराट कोहलीने सोशल मीडियावर एक विक्रम केला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराटने प्रथम स्थान पटकावले आहे.

किंग कोहलीने मैदानाच्या बाहेर केला मोठा विक्रम, सचिनला टाकले मागे

By

Published : Aug 18, 2019, 5:59 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम केले आहेत. मात्र, त्याने आता मैदानाच्या बाहेरही एक मोठे शिखर सर केले आहे. हे करताना त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले.

विराट कोहलीने सोशल मीडियावर एक विक्रम केला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराटने प्रथम स्थान पटकावले आहे. ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर विराटचे तीन करोडपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. या यादीत भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन दुसऱ्या स्थानी आहे.

ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम

सचिनचे ट्विटरवर तीन करोड, फेसबुकवर २.८ करोड आणि इंस्टाग्रामवर १.६५ करोड फॉलोअर्स आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव नसला तरी, त्याच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे.

महेंद्रसिंह धोनीचे फेसबुकवर २.०५ करोड आणि इंस्टाग्रामवर १.५४ करोड फॉलोअर्स झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details