महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल लिलाव: आरसीबीने खरेदी केलेल्या खेळाडूंवर विराटने व्यक्त केलं समाधान

आयपीएल २०२१ च्या लिलावात बंगळुरू संघाने खरेदी केलेल्या खेळाडूंबाबत संघाचा कर्णधार विराट कोहलीने समाधान व्यक्त केले आहे.

very-very-happy-with-our-buys-rcb-skipper virat kohli
आयपीएल लिलाव: आरसीबीने खरेदी केलेल्या खेळाडूंवर विराटने व्यक्त केलं समाधान

By

Published : Feb 21, 2021, 5:18 PM IST

अहमदाबाद - भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल २०२१ च्या लिलावानंतर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने बंगळुरू संघाने खरेदी केलेल्या खेळाडूंबाबत समाधान व्यक्त केले आहे.

आयपीएल २०२१ साठी मिनी लिलाव चेन्नईमध्ये पार पडला. यात बंगळुरू संघाने, ग्लेन मॅक्सवेल (१४.२५ करोड), कायले जेमिन्सन (१५ करोड), डॅनिअल क्रिश्चियन (४.८ करोड), सचिन बेबी (२० लाख), रजत पाटीदर (२० लाख), मोहम्मद अजहरुद्दीन (२० लाख), सूयश प्रभुदेसाई (२० लाख) आणि केएस भरत (२० लाख) या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले आहे.

कर्णधार विराटचा बंगळुरू संघाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात विराटने सांगितले की, 'लिलावामध्ये ज्या खेळाडूंना बंगळुरू संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आम्हाला संघाच्या बॅलन्ससाठी जे हवे होते. यातून आम्हाला ते मिळाले आहे. मागील हंगाम आमच्यासाठी चांगला ठरला. मला विश्वास आहे की, नविन खेळाडू संघाला पुढे नेण्यासाठी मदत करतील.'

हेही वाचा - काय सांगता! विराटच्या घरी एकही नोकर नाही

हेही वाचा -ख्रिस मॉरिस नव्हे तर विराट आहे आयपीएलचा महागडा खेळाडू

ABOUT THE AUTHOR

...view details