महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गेलने ठोकले १२ षटकार; सामना थांबवून पंचांनी घेतले ८ नवीन चेंडू

हा सामना इंग्लंडने जिंकला असला तरी गेलने मात्र त्याच्या चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात गेलने सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला. तसेच इंग्लंडविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचे शतकही पूर्ण केले. बार्बाडोसच्या मैदानात गेलने अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला.

By

Published : Feb 21, 2019, 10:07 PM IST

बार्बाडोस - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकादा ख्रिस गेलची स्फोटक खेळी पाहायला मिळाली. १८ महिन्यांनतर गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता. या पहिल्याच सामन्यात त्याने धमका करत शतकी खेळी केली. त्यात त्याने तब्बल १२ गगनचुंबी षटकार खेचले. १२ पैकी ८ चेंडू थेट त्याने मैदानाबाहेर मारले. त्यामुळे तब्बल ८ वेळा पंचाना नवा चेंडू घ्यावा लागला. नवा चेंडू घेण्यासाठी पंचाना सामना थांबवावा लागत होता.

हा सामना इंग्लंडने जिंकला असला तरी गेलने मात्र त्याच्या चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात गेलने सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला. तसेच इंग्लंडविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचे शतकही पूर्ण केले. बार्बाडोसच्या मैदानात गेलने अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला.

नुकतेच गेलने इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा विंडीज बोर्डाने केली आहे. गेलने या सामन्यात १२९ चेंडूत १३५ धावांची वादळी खेळी केली. त्यात ३ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर विंडीजने इंग्लंडपुढे ३६० धावांचे आव्हान ठेवण्यात आले. जेसन रॉयच्या शतकी खेळीच्या जोरावर हा सामना इंग्लंडने जिंकला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details