कराची- श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंकेने टी-२० मालिका जिंकली तर एकदिवसीय मालिका जिंकली गमावली. बऱयाच कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने सुरळीत पार पडले. या दौऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सामना सुरू असताना एका अंपाअरचा मृत्यू झाला.
नसीम शेख असे या पाकिस्तानी अंपाअरचे नाव असून ते ५६ वर्षाचे होते. घडले असे की, नसीम शेख पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या एका स्थानिक सामन्यात अंपायरींग करत होते. तेव्हा त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि ते मैदानात कोसळले.
या प्रकारामुळे तत्काळ उपस्थित खेळाडूंनी स्ट्रेचर बोलावली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच शेख यांचा मृत्यू झाला. शेख यांना क्रिकेटविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी आपल्या कसायाचा व्यवसाय सोडून क्रिकेटमध्ये अंपायरींग सुरू केली होती.