महाराष्ट्र

maharashtra

INDvBAN: आफ्रिकेविरुध्द षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या उमेशच्या नावे झाला नकोसा विक्रम

By

Published : Nov 23, 2019, 8:06 PM IST

भारत-बांगलादेश संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना सुरू आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत असून या सामन्यात उमेश यादवच्या नावे एक नकोसा विक्रम झाला आहे.

INDvBAN: आफ्रिकेविरुध्द षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या उमेशच्या नावे झाला नकोसा विक्रम

कोलकाता - उमेश यादव वेगवान गोलंदाज म्हणून परिचित आहे. मात्र, त्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेत ताबडतोड फलंदाजी केली. त्याने खालच्या क्रमाकांवर येऊन आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण आता बांगलादेश विरुध्दच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्याच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारत-बांगलादेश संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना सुरू आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत असून या सामन्यात उमेश यादवच्या नावे एक नकोसा विक्रम नोंद झाला आहे.

आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेत चौकार-षटकार ठोकणारा उमेश बांगलादेश विरुध्दच्या दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. बांगलादेशी गोलंदाज अबु जायेद याने उमेशला शून्यावर बाद केले. दिवस-रात्र सामन्यांच्या इतिहासात भारताकडून शून्यावर बाद होणारा उमेश पहिला फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, एकदिवसीय दिवस-रात्र सामन्यात भारताकडून संदीप पाटील हे बाद झाले होते. तर टी-२० मध्ये महेंद्रसिंह धोनी शून्यावर बाद होणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला होता.

हेही वाचा -IND VS BAN : विराटची ऐतिहासिक शतकी खेळी, पाहा व्हिडिओ

हेही वाचा -वेस्‍टइंडीज विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details