कराची - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) उमर अकमलवर तीन वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यांच्यावरील ही बंदी क्रिकेटच्या सर्व स्वरूपात लागू असेल. अकमलला फिक्सिंगच्या प्रस्तावाची मंडळाला माहिती न दिल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या बंदीवर मोठा भाऊ कामरान अकमलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कामरान म्हणाला, “ उमरला माझा सल्ला आहे की त्याने शिकले पाहिजे. जर त्याने चूक केली असेल तर त्याने इतरांकडून शिकले पाहिजे. आम्ही एकत्र खेळतो आणि आपले लक्ष फक्त क्रिकेटवर असते. तो अजूनही तरुण आहे. त्याने विराट कोहलीकडून शिकले पाहिजे. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात विराट हा वेगळा खेळाडू होता, परंतु नंतर त्याने आपला दृष्टीकोन बदलला. आता पाहा तो कुठे आहे. आमचा बाबर आझम हा जगातील तीन सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.”