लाहोर - पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू उमर अकमल याने लंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३ वर्षानंतर पुनरागमन केले. मात्र, अकमलचे हे पुनरागमन चांगले झाले नाही. लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १० वेळा शून्यावर बाद होणाच्या विक्रमाशी अकमलने बरोबरी केली आहे.
हेही वाचा -'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला
लागोपाठच्या दोन सामन्यात अकमलला भोपळाही फोडता आला नाही. त्याच्या या कामगिरीमुळे नेटिझन्सनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. अकमल पाकिस्तानकडून सप्टेंबर २०१६ मध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला होता आणि त्यानंतर त्याला २०१९ मध्ये संधी मिळाली. मात्र, या संधीचे अकमलला सोने करता आले नाही. याआधी श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १० वेळा शून्यावर बाद झाला होता.
भानुका राजपक्षेच्या ७७ धावांच्या जोरावर श्रीलंका संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला हरवले. पाकला ३५ धावांनी पराभूत करत लंकेने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत लंकेने २-० ने आघाडी घेतली.