दुबई - आयसीसी १९ वर्षांखालील विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारत-बांगलादेशच्या युवा खेळाडूंमध्ये राडा झाला. आयसीसीने या प्रकरणामध्ये पाच खेळाडूंना दोषी ठरवले असून त्यात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण -
विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला.
या प्रकरणात आयसीसीने दोषी ठरवलेले खेळाडू -
मोहम्मद तोवहीद हृदय, शमीम होसैन आणि रकिबुल हसन या बांगलादेशी खेळाडूंसह आकाश सिंग व रवी बिश्नोई या दोन भारतीय खेळाडूंना आयसीसीने दोषी ठरवले आहे.
खेळाडूंनी आयसीसीच्या या कलमाचा केला भंग -
पाचही दोषी खेळाडूंवर आयसीसीचे कलम २.२१ चे उल्लंघन केले असल्याचा आरोप आहे. तर बिश्नोईवर या कलमासह आणखी एक कलम २.५ चा भंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पाचही खेळाडूंनी त्यांची चूक मान्य केली आहे.