महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

U-१९ World Cup : भारत उपांत्यपूर्व फेरीत, आता गाठ ऑस्ट्रेलियाशी

भारतीय संघ सद्या फुल्ल फॉर्मात आहे. तसेच तो गतविजेता असल्याने त्याला विजयाची नामी संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या आधी गेल्या वेळेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. भारतीय संघाने या सामन्यात बाजी मारत विजेतेपद पटकावले होते.

u 19 world cup 2020 : ind vs aus quarter final preview
U-१९ World Cup : भारत उपांत्य फेरीत, आता गाठ ऑस्ट्रेलियाशी

By

Published : Jan 27, 2020, 8:56 PM IST

Updated : Jan 28, 2020, 7:28 PM IST

केपटाऊन- आयसीसी १९ वर्षाखालील विश्व करंडक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत, भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. ही लढत उद्या (मंगळवार) पोचेफस्ट्रूमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघ सद्या फुल्ल फॉर्मात आहे. तसेच तो गतविजेता असल्याने त्याला विजयाची नामी संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या आधी गेल्या वेळेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. भारतीय संघाने या सामन्यात बाजी मारत विजेतेपद पटकावले होते.

भारतीय संघ

भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला तर ऑस्ट्रेलिया त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली १९ वर्षाखालील विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून भारताला चौथे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाई संघ
  • भारतीय संघ -
  • प्रियम गर्ग ( कर्णधार ), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रुव चंद जुरेल, शाश्वत रावत, सिद्देश वीर, शुभांग हेग्डे, रवि बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अर्थव अंकोलेरकर, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील आणि सीटीएल. रक्षण.
  • ऑस्ट्रेलियाचा संघ -
    मॅकेंजी हार्वी (कर्णधार), कूपर कोनली, ओलिवर डेविस, सॅम फॅननिंग, जॅक फ्रेसर मॅक्गर्ग, लाचलान हियर्ने, कौरे कॅली, लियम मार्शल, टॉड मर्फी, पॅट्रिक रोवे, तनवीर सांघा, लियाम स्कॉट, ब्रॅटली सिम्पसन, कोनोर सोली आणि मॅथ्य विलियंस.
Last Updated : Jan 28, 2020, 7:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details